१३ वर्षांची दिरंगाई, आर्थिक संकट अन् ५० तक्रारी करूनही न्याय नाही

Foto
फिनिक्स क्लासेसचे कोरडे मृत्यू प्रकरण : चौघांवर गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतील कथित फसवणूक, पोलिस तपासातील १३ वर्षांची दिरंगाई, बदनामी आणि आर्थिक संकटामुळे राहत्या घरावर आलेली जप्तीची कारवाई या सर्वांना कंटाळून फिनिक्स इंग्लिश स्पीकिंग क्लासेसचे संचालक मोहन शिवराम कोरडे (६०, रा. द्वारकापुरी, उस्मानपुरा) यांनी काल (दि.७) जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी तीन पानांची नोट लिहिली असून त्यात पोलिस अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या पत्नी सुनीता कोरडे यांच्या फिर्यादीवरून
एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रामचंद्र सांगवीकर (रा. श्रेयनगर), सुधा प्रभाकर साने (रा. भडकलगेट), उद्धव राऊत आणि संतोष जाधव (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
'मृत्यूनंतर तरी न्याय द्या'
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या तीन पानी निवेदनात कोरडे यांनी त्यांच्या प्रकरणाची क्राइम ब्रांच किंवा एसआयटीमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, संबंधित आरोपींसह दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि न्याय मिळेपर्यंत घराच्या लिलावाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.
दुकानांच्या वादाची सुरुवात व्यवहारातून
कोरडे दाम्पत्य २००१ पासून शहरात इंग्रजी शिकवणी घेत होते. २००३ मध्ये त्यांनी विजय सांगवीकर आणि सुधा साने यांच्याकडून सिडको एन-१ येथील तापडिया सिने मार्केटमधील तीन दुकाने भाड्याने घेतली होती. २००६ मध्ये ही दुकाने कायमस्वरूपी खरेदी
करण्याचा करार झाला. त्यासाठी कोरडे यांनी टप्प्याटप्प्याने सात लाख ५० हजार रुपये दिल्याचा दावा आहे. मात्र, पूर्ण रक्कम घेतल्यानंतरही दुकाने नावावर करण्यात आली नाहीत आणि बनावट बॉण्डच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप कोरडे यांनी केला होता. याप्रकरणी २०११ पासून न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions